ड्रग्ज सिंडिकेटप्रकरणी अश्फाकच्या साथीदाराला बेड्या

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात नशेचे सिंडिकेट चालवणार्‍या शेख अश्फाक याच्या टोळीतील पसार आरोपी शेख हाफिज शेख सलीम (वय २८, रा. चेलीपुरा) हा अखेर पोलिसांना गवसला. त्याच्या खात्यातून अश्फाकसह इतरांच्या खात्यांतून व्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. 
महिनाभरापासून गुन्हे शाखेने शहरात नशेच्या बाजारात कफ सिरप आणि एमडी ड्रग्ज विक्री करणारे रॅकेट टार्गेट करीत २१ जणांवर गुन्हे नोंद केले. यातील पसार मुख्य आरोपी शेख अश्फाक यालादेखील नाशिक येथून नुकतेच ताब्यात घेतले. त्याचा साथीदार आणि टोळीचा भाग असलेला हाफिज पसार होता. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुळे यांना तो मंगळवारी (दि. २४) कटकट गेट येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अजमेरची ‘सैर’
आरोपी हाफिज अश्फाकचा मित्र आहे. त्याच्याकडून सिरप आणि ड्रग्जची खरेदी-विक्री करण्यासह माल लपवायला तो मदत करत. त्याच्या खात्यावरून अश्फाकसह इतरांशी व्यवहारही झाले आहेत. तो अजमेर आणि इतर राज्यांत अश्फाकसोबत ‘सैर’ करीत असल्याचे समोर आले. नाशिक येथून अश्फाकला ताब्यात घेण्यापूर्वी काही वेळ आधीच तो पसार झाला होता.